Saturday, August 10, 2013
Monday, June 10, 2013
(बे)सावध
एका (बे)सावध क्षणी
तू सावधान म्हटलेस
हारासह हात
गळ्यात माझ्या आले
लालीही चूर लाजेने झाली
छम छमणारी पाऊले
जरा स्तब्ध झाली
सुगंधी श्वासात बंदीवान केले
सुगंधी श्वासात बंदीवान केले
कांही क्षण बेसावध गेले
कांही क्षण बेसावध गेले...
कांही क्षण बेसावध गेले...
--- मधुघट
( मधुकर अर्जुन सावंत )
मनोगत
"मधुघट" उचलण्याचा माझा हा प्रयत्न.
मला तो उचलुन डोईवर घेऊन लचकता येत नाही,
मुरुडत चालताही येत नाही,
ठुमकता सुद्धा येत नाही.
तेव्हा हा घट, काव्यसरितेच्या घाटावर ठेऊन,
मी फक्त मधुकर बनण्याच्या प्रयत्न करतो आहे.
घटातील मधु तुमच्या चवीसाठी आणतो आहे .
मला तो रिता करता येणार नाही.
तो तुमच्यासाठी आहे.
मधमाशीने साठविलेले मध ती पीत नाही,
किंबहुना तो तिच्यासाठी नसतोच.
तेव्हा तुमच्यासाठी तुमच्याजवळ आणलेल्या मधु ची चव तुम्हालाच कळणार
ती मला कळवावी .
ही विनंती
आपला स्नेहवांच्छित
मधुघट
( मधुकर अर्जुन सावंत )
Subscribe to:
Comments (Atom)
