एका (बे)सावध क्षणी
तू सावधान म्हटलेस
हारासह हात
गळ्यात माझ्या आले
लालीही चूर लाजेने झाली
छम छमणारी पाऊले
जरा स्तब्ध झाली
सुगंधी श्वासात बंदीवान केले
सुगंधी श्वासात बंदीवान केले
कांही क्षण बेसावध गेले
कांही क्षण बेसावध गेले...
कांही क्षण बेसावध गेले...
--- मधुघट
( मधुकर अर्जुन सावंत )

No comments:
Post a Comment